ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिल्याची माहिती गोवा पोलिस सूत्रांनी दिली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनाली फोगटला गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याचा दावा गोवा पोलिस सूत्रांनी केला आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे पोलिसांनी सांगितले
गोवा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोवा पोलिसांनी पुष्टी केली आहे की सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि सुधीर सांगवान खून प्रकरणात दोषी ठरविण्यासाठी हे पुरेसे आहेत. सोनाली फोगटच्या हत्येतील आरोपींना जबाबदार धरण्यासाठी खटल्यादरम्यान न्यायालयात ते पुरेसे आणि मजबूत असेल, असा विश्वास गोवा पोलिसांना आहे.
सोनाली फोगट खून प्रकरणात मोठा खुलासा, पीए सुधीर सांगवानने दिली गुन्ह्याची कबुली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -