Sunday, August 3, 2025
Homeसांगलीमिरजेत गणेशोत्सव मिरवणूकीत पुन्हा डॉल्बीचा दणदणाट:आणखी तीन गणेश मंडळांवर पोलिसांनी केले...

मिरजेत गणेशोत्सव मिरवणूकीत पुन्हा डॉल्बीचा दणदणाट:आणखी तीन गणेश मंडळांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेत गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणूकीत साऊंड सिस्टीमचा दणदणाट करीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या तीन गणेश मंडळांवर आणि साऊंड सिस्टीम मालकांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मंडळांकडून मिरज शहरात ३१ आॅगस्ट रोजी चतुर्दशीच्या दिवशी गणरायांची मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापणा करताना मिरवणूकी दरम्यान साऊंड सिस्टीमचा दणदणाट करीत आवाज मर्यादेचे उल्लंघन केले होते.



पोलिस प्रशासनाकडून इशार देऊन ही आवाज मर्यादा वाढविण्यात आल्याचे यंत्राद्वारे स्पष्ठ होताच पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वोदय गणेश उत्सव मंडळचे अध्यक्ष प्रविण व्हटकर आणि साऊंड मालक शुभम बाळू जगताप रा. पुणे नागपुर चाळ येरवडा पुणे, गजवक्र तरूण मंडळाचे अध्यक्ष किरण घोडके आणि साऊंड सिस्टीम मालक अवधुत नामदेव सागावकर रा. किल्लाभाग मिरज, शेतकरी कामगार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि साऊंड सिस्टीमचे मालक संजय बिरडे यांच्यावर ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यांत आला आहे. या मंडळाचे परवाना रद्द करून साऊंड सिस्टीमचे साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



या मंडळांकडून शहरतील फुलारी चौक (जुने आग्निशामक केंद्र), महाराणा प्रताप चौक याठिकाणी आवाज मर्यादेचे उल्लंघन करताना निदर्शनास आले. गणेश उत्सवाच्या आगमन सोहळ्यात साऊंड सिस्टीमद्वारे दणदणाट करीत नागरिकांना त्रास देणा-या तीन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आतापर्यंत सात गणेश उत्सव मंडळ आणि त्याच्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर एकाच डॉल्बी चालकांवर सलग दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेशोत्सव मिरवणुकीत आवाजाची मर्यादा दिली असतानाही अनेक मंडळांनी जवळपास 125 डेसीबल पेक्षा जास्त आवाज सोडून डॉल्बीचा दणदणाट केल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -