ताजी बातमी ऑनलाईन टीम
बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची अमिताभ बच्चन आणि दक्षिणेतील चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा पहिला हिंदी चित्रपट ‘गुडबाय ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल (Vikas Bahl) यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले होते.
7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला
रश्मिका मंदानाने इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर शेअर केले असून त्याला एक सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, ‘पापा आणि मी 7 ऑक्टोबरला तुमच्या कुटुंबाला भेटायला येत आहोत’. गुडबाय हा चित्रपट पुढच्या महिन्यात 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्या लेकीच्या भूमिकेत आहे. पोस्टरमध्ये वडील आणि मुलीची जोडी आयुष्याचा आंद घेताना दिसत आहे. हे दोघे पतंग उडवताना दिसत आहेत.
रश्मिकाकडे तीन बॉलिवूड चित्रपट
रश्मिका मंदानाकडे तीन बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात गुडबाय तसेच टायगर श्रॉफसोबत ‘स्क्रू धीला’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ यांचा समावेश आहे. गुडबायची रिलीज डेट जाहीर झाली असली तरी इतर दोन चित्रपटांची रिलीज डेट अजून यायची आहे. अशा परिस्थितीत गुडबाय हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला तर रश्मिकाचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट असेल.