Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीआळते गावात लंम्पीस्कीन रोगाचा शिरकाव; तातडीने लसीकरणाची गरज

आळते गावात लंम्पीस्कीन रोगाचा शिरकाव; तातडीने लसीकरणाची गरज

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आळते (ता. हातकणंगले) येथे सात ते आठ गाईंना लंम्पीस्कीन या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. भविष्यकाळात या रोगाचा फैलाव होवु नये. याकरिता गोकुळ दूध संघामार्फत अनेक उपाययोजना सुचविल्या जात आहेत. तर प्रशासनाकडून तीनशे गाईंना लसीकरण झाले आहे. तरी सुद्धा साथीच्या रोगांमुळे पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
हातकणंगले तालुक्यातील आळते गावामध्ये 900 ते 1 हजार गायी आहेत. त्यामध्ये संकरितसह देशी गायीचा समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसापासून गाईंच्या अंगावर फोड उठणे, सांधेदुखी, ताप येणे, गाय वैरण व भरडा न खाणे अशी लक्षणे दिसुन दूध देण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. याबाबत गोकुळ दूध संघाकडून स्वच्छता राखण्यासह विलगीकरण करणे. आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर डोस देणे. यासह अनेक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उद्या दिनांक ६ सप्टेंबर पासून लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी व आळते गावामध्ये पुन्हा लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचे आळते येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सर्जे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -