Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : वर्क ऑर्डरअभावी रखडले कोल्हापूर- कळे रस्त्याचे काम

Kolhapur : वर्क ऑर्डरअभावी रखडले कोल्हापूर- कळे रस्त्याचे काम


कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुपरीकरणाच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजूरी मिळाली असून त्याची निविदा देखील भरली आहे. जालना येथील व्ही.पी.सेट्टी कंपनीने तब्बल 36 टक्के कमी दराने निविदा भरली आहे. त्यामुळे नवीन शासन निर्णयानुसार ज्या कंपनीने 20 टक्केहून अधिक कमी दराने निविदा भरली असेल त्या कंपनीने साडेबारा टक्के सेक्युरिटी डिपॉझिट शासनाकडे जमा करणे अपेक्षित आहे. पण निविदा भरलेल्या काळात कोरोना महामारी असल्यामुळे सुरुवातीस भरलेल्या परफॉर्मन्स डिपॉझिटवर वर्कऑर्डर द्यावी, सिक्युरिटी डिपॉझिट लादू नये असे कंपनीचे म्हणणे आहे. परिणामी शासन आणि कंपनीच्या वादात कामाची वर्कऑर्डर झाली नसून कोल्हापूर कळे मार्गाचे काम रखडले आहे.

कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.166 जी) दुपरीकरण प्रस्तावित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर (फुलेवाडी)-कळे या 16.44 किलोमीटर रस्त्याचे दुपरीकरण होणार आहे. 123 कोटींच्या या प्रोजेक्टला केंद्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण हे काम करण्यासाठी करार झालेल्या व्ही.पी.सेट्टी या कंपनीने 36 टक्के कमी दराने मार्च 2022 मध्ये निविदा भरली असून 89.91 कोटींमध्ये हे काम केले जाणार आहे. ठेकेदाराने अडीच टक्के परफॉर्मन्स डिपॉझिट भरली आहे. पण 20 टक्केहून अधिक कमी दराने निविदा भरल्यामुळे शासनाने पुन्हा साडेबारा टक्के सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यास सांगितले आहे. पण कोरोना काळात मंजूर झालेल्या कामासाठी सिक्युरिटी डिपॉझिट घेऊ नये, त्यामध्ये सूट द्यावी अशी मागणी कंपनीने शासनाने केली आहे. शासनाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे कामाची वर्कऑर्डर होऊ शकलेली नाही. याबाबत 29 ऑगस्ट रोजी कंपनीचे प्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असून लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेबरअखेरीस वर्कऑर्डर निघण्याची शक्यता असून ऑक्टोबरच्या सुरुवातीस रस्त्याचे काम सुरु होणार आहे. वर्कऑर्डरनंतर काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास 18 महिन्यांची मुदत आहे. एकूण 16 मीटर रुंदीचा हा रस्ता होणार आहे. यामध्ये 10 मीटर काँक्रीटचा रस्ता तर दोन्ही बाजूस 3 मीटरची साईड पट्टी होणार आहे. त्यामध्ये रस्त्याशेजारील गावांनजीक सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे 1 किलोमीटर ते 500 मिटर लांबीचे आणि 1 मीटर रुंदीचे काँक्रीट गटर बांधले जाणार आहे. भोगावती नदीवर बालींगा येथील जुन्या पुलाच्या शेजारीच नवा पूल बांधला जाणार आहे. तर दोन ठिकाणी लहान पूल, 12 में 5 साकव, 4 पॅसेंजर शेल्टर (प्रवासी निवारा शेड, स्टैंड) होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -