Sunday, August 3, 2025
Homeमनोरंजनपुष्पा-२ साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी, सलमानअक्षयलाही टाकले मागे

पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी, सलमानअक्षयलाही टाकले मागे


पुष्पा चित्रपटच्या यशानंतर साऊथ स्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पॅन इंडिया स्टार झाला आहे. त्याच्या मानधनापासून ते स्टारडमपर्यंत हेवी ग्रोथ झाली. म्हणूनच तर पुष्पा २ साठी त्याला मोठे मानधन ऑफर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याचबरोबर, अल्लू अर्जुनने सलमान खान आणि अक्षय कुमारला मानधनाच्या बाबतीत मागे टाकल्याचे म्हटले जात आहे.

पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन घेतले इतके मानधन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुनला १२५ कोटी मानधन दिले जाणार आहे, असेही वृत्त आहे की, पुष्पा २ चे बजेट ४५० कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुन १२५ कोटी मानधन घेतल्यानंतर तो तिसरा हाएस्ट पेड अभिनेता बनला आहे.

याआधी असे वृत्त होते की, सलमान खान आपल्या आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’साठी १२५ कोटी घेतले आहेत. सलमान खानला निर्मात्यांनी इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही स्टार्स आपला वेगवेगळा स्वॅग आहे.

सलमान-अल्लूच्या चित्रपटांची प्रतीक्षा
चाहत्यांना सलमान खान आणि अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सलमान खानचा ‘किसी
का भाई किसी की जान’ हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी रिलीज होईल. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा-२ पुढील वर्षी रिलीज होऊ शकतो. पुष्पा सीरीजमधील दुसरा भाग हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे, या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानादेखील दिसणार आहे. पुष्पा २ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -