ताजी बातमी ऑनलाईन टीम
नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील मिरज शहराचे अस्तित्व संपविण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय मार्गावरील दिशादर्शक फलकावरून मिरज शहराचे नावच गायब झाले आहे. याबाबत मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राधिकरणाने दिशादर्शक फलकात दुरुस्ती न केल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक ठिकाणी महामार्गावरील प्रमुख शहर आणि गावांचे दिशा दर्शविणारे दिशा दर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, या फलकावरून मिरज शहराचे नाव गायब झाल्याने मिरज सुधार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जाणीवपूर्वक ऐतिहासिक मिरज शहराचे अस्तित्वावर उठलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 15 दिवसांत दिशादर्शक फलकावर मिरज शहराच्या नावाचा उल्लेख न केल्यास समितीचे कार्यकर्ते नागपूर-रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी आणि अध्यक्ष शंकर परदेशी यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गाकडून मिरजेचे अस्तित्व संपविण्याचा घाटदिशा दर्शकातून मिरजेचे नाव वगळले:मिरज सुधार समितीचा आंदोलनाचा इशारा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -