ताजी बातमी ऑनलाईन टीम
औरंगाबादमधली बेपत्ता यूट्यूबर आणि सोशल मीडिया इफ्लुएंसर बिंदास पूजाो हीचा शोध लागला आहे. ती मध्य प्रदेशातील इटारसी येथे आढळली आहे. बिंदास काव्या कालपासून बेपत्ता होती. काव्याच्या पालकांनी पोलिसांसह सोशल मीडियावर देखील मुलीचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. अखेर आज पोलिसांनी काव्याला इटारसी येथून शोधून काढले आहे. यानंतर काव्या तिच्या आई-वडिलांविषयी मनात राग धरून औरंगाबादहून लखनौकडे जात होती अशी माहिती समोर आली आहे.
पालकांनी शेअर केला व्हिडिओ
काव्या सापडल्याची माहिती तिच्या पालकांनीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे. व्हिडिओमध्ये काव्याच्या वडिलांनी सांगितले की, ती त्यांच्यावर रागावून लखनऊला जात होती. मात्र पोलिसांना काव्या इटारसीमध्ये सापडली आहे. दरम्यान 9 सप्टेंबर रोजी काव्याच्या पालकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. तसेच तिला शोधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे.
मूळची औरंगाबादची आहे काव्या
विशेष म्हणजे काव्या हे सोशल मीडियावर एक प्रसिद्ध नाव आहे. ‘बिंदास काव्या’ या यूट्यूब चॅनलमुळे चाहते काव्याला ओळखतात. काव्या तिच्या गेमिंग कौशल्यांसाठी YouTube च्या लिप सिंकसाठी ओळखली जातो. काव्या मूळची औरंगाबादची असून वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. काव्या तिच्या चॅनलवर व्लॉग चालवते.
YouTuber Bindass Kavya: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली यूट्यूबर बिंदास काव्या इटारसीत सापडली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -