Wednesday, March 12, 2025
Homeकोल्हापूरब्रेकिंग : कोल्हापुरात 'पबजी' चा एक किल, तरुणानं संपवलं आयुष्य

ब्रेकिंग : कोल्हापुरात ‘पबजी’ चा एक किल, तरुणानं संपवलं आयुष्य

पब्जी खेळण्यावरून झालेल्या वादानंतर तरूणाने टोकाचं पाऊल उचलंल आहे. विषप्राशन करून या तरूणाने आपले जीवन संपविले आहे. हर्षद डकरे (वय – १९) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. करवीर तालुक्यातील घानवडे गावात ही घटना आहे. हर्षदच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त जात आहे. तर पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद डकरे हा तरूण सतत पब्जी खेळत होता. पब्जी खेळू नको असं सतत त्याला त्याचे कुटुंबीय सांगत होते. यावरून आज सकाळी घरात वाद झाला. याचा राग मनात धरून हर्षद सकाळी घर सोडून निघून गेला. बराच वेळ तो घरी आला नाही म्हणून त्याच्या कुटुंबाने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याच्याशी संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो जंगलात निघून गेला आणि त्याने विषप्राशन केल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी जंगलाकडे धाव घेत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -