ताजी बातमी ऑनलाईन टीम
तडीपार आदेशाचा भंग करून सांगलीत वास्तव्यास आलेल्या अय्याज शकील शेख (वय २२, रा. पोळ मळा, शंभरफुटी रस्ता, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली.अय्याज शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला अनेक गुन्ह्यात यापूर्वी अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच रहायच्या. त्यामुळे त्याच्याविरूद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासमोर या प्रस्तावर सुनावणी झाली होती. गेडाम यांनी शेखला दि. २८ जून २०२२ रोजी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. गुरुवारी सायंकाळी तो विश्रामबाग येथील साई मंदिरजवळ चाणक्यपुरी गार्डसमोर उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याविरूद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार आदेशाचा भंग सांगलीत वास्तव्यास आलेल्या अय्याज शेखला अटक
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -