राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गरीबी, बेरोजगारी तसेच कौंटुबिक समस्या अशा कारणांमुळे त्रस्त असल्याने लोक आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. अशीच एक साताऱ्यातील (Satara News) वाई तालुक्यातून (Wai Taluka) समोर आली आहे. येथील दाम्पत्याने मूल होत नसल्यामुळे नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या (Husband wife suicide) केली आहे. त्यांच्या या टोकाच्या पाऊलामुळे त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. तसेच परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
10 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा राजपुरे असे होते. या दोघांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, लग्नाला दहा वर्षे होऊनही त्यांना अपत्य नव्हते. याच दुःखातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. हे दोघंही मूल होत नसल्याने चिंतेत असायचे. मूल होत नसल्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचारही घेतले होते. मात्र, तरी देखील त्यांना यश झाले नाही. आपल्याला आई-बाप होता येत नसल्याने ते दोघंही दुखी होते. या नैराश्यातूनच अखेर त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपले. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
शेतकरी कुटुंबातील होते दाम्पत्य
तानाजी राजपुरे हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी काही काळ मुंबईमध्ये माथाडी कामगार म्हणून काम केले. मात्र नंतर ते पुन्हा गावी येऊन शेती करत होते. या काळात मूल होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी यासाठी वैद्यकीय उपचार देखील घेतले होते. मात्र तरी देखील त्यांना यश आले नाही. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. या विज्ञानाच्या काळात कोणतीही गोष्ट करणे शक्य आहे. मात्र असे असतानाही या दाम्पत्याने आशा सोडून टोकाचे पाऊल उचलले.
नैराश्याचे प्रमाण वाढतेय
सध्याच्या काळात लोकांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. छोट्या-छोट्या कारणांवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही वर्षात पैशांच्या कारणामुळे देखील पती-पत्नीचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये देखील नैराश्य आले आहे. यामुळे लोकांना संघर्ष करण्यापेक्षा आत्महत्या हाच सोपा पर्याय वाटत आहे.