Sunday, July 27, 2025
Homeयोजनानोकरीग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी, SBI मध्ये 1673 जागांसाठी भरती…!!

ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी, SBI मध्ये 1673 जागांसाठी भरती…!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही पदांसाठी बंपर मेगाभरती होत आहे. याविषयीची अधिसूचनाही बँकेकडून जारी करण्यात आली आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (SBI PO Recruitment- 2022)

एकूण जागा – 1673

पुढील पदासाठी भरती – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक, पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही अर्ज करु शकतात. मुलाखतीवेळी 31 डिसेंबर 2022 पूर्वी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे. तसा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2022 रोजीपर्यंत 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. वयातील सवलत सरकारच्या नियमानुसार लागू आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया – 22 सप्टेंबरपासून सुरु

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022

अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022

अर्जाची प्रिंटआउट काढण्याची अंतिम तारीख- 27 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख – 22 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

sbi.co.in/careers

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -