Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद? महिला पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद? महिला पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

कोल्हापूर भाजपमधील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांनी महिला पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे समोर आले आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली
आहे. तसेच त्याबाबतचे निवेदन ही देण्यात आले आहे.

चार दिवसांपूर्वी अंगणवाडी साहित्य वाटप कार्यक्रमात महेश जाधव यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा घरातला वाद घरातच मिटवू, चार दिवसात बसून बोलू असं सांगून अश्वस्त केलं.

कोल्हापूर पोटनिवडणुकीपासून हा वाद धुमसत आहे. पोट निवडणुकीत अनेकांनी पक्षाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -