Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : नेर्ले येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सांगली : नेर्ले येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे पुणे बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. नेर्ले येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुमारे सहा ते सात महिन्याच्या मादी बिबट्याला वाहनाची धडक बसली. ही घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

वनाधिकारी सुरेश चरापले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जबर मार बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या आई समवेत रस्ता ओलांडून पलीकडे जाताना ही घटना घडली असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -