चारचाकी वाहनावरील ताबा सुटून संकेश्वरजवळील वंटमूरी येथे झालेल्या अपघातात सुलतान पीर चमनमलिक-काझी ( वय 23 रा. जहाण्याबाबा दर्गाजवळ, शास्त्री चौक, मिरज) हा तरुण जागीच ठार झाला. तर, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविवारी दुपारी सुलतान काझी आणि त्याचे दोघे मित्र चारचाकी वाहनाने आंबोली घाट येथे फिरण्यास जात होते. सुलतान हा गाडी चालवत होता. संकेश्वर-वंटमूरी रस्त्यावर वंटमूरे गावाजवळ चालक सुलतान याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याशेजारील झाडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की चालक सुलतान हा जागीच ठार झाला. तर, इतर दोघे किरकोळ जखमी झाले. नागरिकांनी दोघांना बेळगांवच्या केएलई रुग्णालयात दाखल केले आहे. मयत सुलतान हा सामाजिक कार्यकर्ते पीर काझी यांचा मुलगा होत. त्याला दोन वर्षाचा आणि 15 दिवसांचा अशी दोन मुले आहेत. अपघातामुळे शास्त्री चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संकेश्वर जवळील अपघातात मिरजेचा तरुण ठार दोघे जण जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -