ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेआधी संघातील तीन खेळाडू मालिकेतून बाहेर पडले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत 28 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियातून दीपक हुड्डा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडले आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत, तर बीसीसीआयने (Bcci) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती दिली आहे. या तीन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी मालिकेत अडचणी निर्माण होऊ शकतात.