Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकारखान्याला नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही, अमल महाडिक यांचा पलटवार

कारखान्याला नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही, अमल महाडिक यांचा पलटवार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कारखान्याला आमचे नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न मला पडतो असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला आहे.


सतेज पाटील यांनी उद्या होणाऱ्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सभा घेऊन महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला महाडिक यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले आहे.

मागील ३० वर्षे आम्ही सत्तेत असताना कारखान्याचा ७/१२ आणि नाव आहे तसं जपलं. याउलट सतेज पाटलांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच कारखान्याचे नाव बदलले. एवढंच नाही तर १०००० सभासद एका रात्रीत कमी केले. किमान ‘अजिंक्यतारा’ या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे.असे आव्हानही महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

बावडा आपली जहागीर असल्यासारखी सतेज पाटील यांनी वक्तव्य करू नये. यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी पातळी सोडून टीका केली आहे, तेव्हा आम्ही दुर्लक्ष केले. पण इथून त्यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा महाडिक यांनी पत्रकातून दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -