राज्यातील सत्तांतरानंतर बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. आता या बदल्यांनुसार ठाणे (Thane) पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या नव्या सरकारने केल्या आहेत.
तुकाराम मुंडेंचीही बदली
हा खांदेपालट करताना रोहन घुगे यांच्याकडे वर्धा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप व्यास यांना अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास पदी पाठवण्यात आले आहे. वत्सा नायर-सिंह यांना गृहनिर्माण, मनीषा म्हैसकर यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पद आणि मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. आदिवासी विकास प्रदीप व्यास यांना देण्यात आले आहे. प्रवीन दराडे यांना पर्यावरण, हर्षदिप कांबळे यांना उद्योग, संजय खंदारे यांना आरोग्य, सौरभ विजय यांना पर्यटन, मिलिंद म्हैसकर यांना उत्पादन शुक्ल आणि नागरी उड्डयण तसेच तुकाराम मुंडे (आयुक्त आरोग्य) यांचीही बदली करण्यात आली आहे.
लीना बनसोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, ठाणे येथील पदभार असेल. प्रकल्प संचालक म्हणून कौस्तुभ दिवेघावकर असतील. तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दराडे पर्यावरण विभागात सचिव पुणे म्हणून पदभार देण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्र सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकपदी असणाऱ्या ए. आर. काळे यांचाही खांदेपालट करण्यात आलाय. त्यांना मुंबईच्या अन्न व औषध आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. औरंगाबादेतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांना पुण्यात पाठवण्यात आले. त्यांना येथील झोपडपट्टी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.