Thursday, May 30, 2024
Homenewsपेमेंट सिस्टीममध्ये होणार मोठे बदल! क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटसाठी नवे नियम

पेमेंट सिस्टीममध्ये होणार मोठे बदल! क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटसाठी नवे नियमतुम्ही क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटनं पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया अर्थात RBI नं पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून हे बदल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. RBI लवकरच यासाठी नवे नियम लागू करणार आहे. ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यासाठी RBI नवे बदल करत आहे.

बँक (Bank), मोबाईल वॉलेटसाठी (Mobile Wallet) नवे नियम लागू होणार आहे. वॉलेटमधून पैसे डेबिट होण्याआधी ग्राहकांची परवानगी गरजेची असणार आहे. त्यामुळे UPI च्या (Unified Payments Interface) माध्यमातून यापुढे वॉलेटमधून थेट पैसे डेबिट होणार नाही, असं धोरण आखण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत नवे नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

दरम्यान, ऑनलाईन पेमेंट सिस्टीममुळे आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांचा बँक आणि मोबाईल वॉलेटवर थेट परिणाम होणार आहे. कारण आता यापुढे वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत तर वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग्राहकांची परवानगी बंधणकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेली माहिती अशी की, नव्या नियमांनुसार, बँकांना ग्राहकांना आवर्ती देयकाबद्दल आगाऊ माहिती देणं बंधनकारक राहील. त्याचबरोबर ग्राहकांकडून होकार मिळाल्यानंतर व्यवहार केले जातील. या नियमाचा नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने+ हॉटस्टारसह विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी मासिक सदस्य शुल्कावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मोबाईल, युटिलिटी आणि इतर बिलांसाठी ऑटो-पेमेंटच्या नियमात पुढील महिन्यापासून बदल होण्याची शक्यता आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) वापरून वारंवार होणारे व्यवहार 1 ऑक्टोबरपासून अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशनची (AFA) आवश्यकता असेल, असंही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -