Saturday, July 27, 2024
Homenewsकिरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरला येणार ! वेळ आणि मुहूर्तही ठरला

किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरला येणार ! वेळ आणि मुहूर्तही ठरला


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एकामागोमाग एक आरोप करत सुटलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूर दौरा जाहीर केला आहे.


येत्या मंगळवारी kirit somaiyak किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.


त्यांच्या मागील दौऱ्याला सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापुरात येऊ न देता कराडमधून माघारी धाडण्यात आले होते. सोमय्यांना परत धाडण्यावरून राज्य सरकारमधील गृह कलह समोर आला होता. त्यामुळे पुढील दौऱ्यात काय होणार ? याची आता उत्सुकता आहे.


किरीट सोमय्यांना कराडात रोखले
सोमवारी कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू केल्यानंतर मुंबईपासून कराडपर्यंत पोलिस माजी खासदार किरीट सोमय्या यांची कोल्हापूरला जाऊ नये, यासाठी मनधरणी करत होते. ठाण्यासह सातार्यात पोलिसांनी चर्चा करत रेल्वेतून उतरण्याची विनंतीही केली होती.


कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कराड रेल्वेस्टेशनवर कोल्हापूर जिल्हा प्रवेश मनाईचा आदेश किरीट सोमय्या यांच्या हाती दिला आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कराडच्या विश्रामगृहात आणण्यात आले. मुंबईपासून रविवारी रात्री 8.30 वाजता सुरू झालेला हा आठ तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा कराडला पहाटे 4.30 वाजता समाप्त झाला.
मुंबईतून कोल्हापूरला येत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेर आपणास अडवण्यात आले होते. तेथे रेल्वे मिळू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न करत खोटा मनाई आदेश वाचून दाखवला. त्यानंतर आदेशाची मागणी करताच पोलिस पळून गेल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.
रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर ठाण्यातही स्थानिक पोलिसांनी आपणास कोल्हापूरला जाऊ नये, असे सांगत रेल्वेतून उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आपण आदेश दाखवण्याची मागणी केली. पोलिस आदेश दाखवू शकले नाहीत, असे सोमय्या म्हणाले.
Kirit Somaiya : कायद्याचा आदर केला
रेल्वे सातारा रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी आपण बसलेल्या डब्यात आले.


सातार्यातून रेल्वे निघाल्यापासून कराड रेल्वेस्टेशन येईपर्यंत पोलिस अधिकार्यांशी चर्चा सुरूच होती. कराड रेल्वेस्टेशनवर तिरुपती काकडे यांनी कोल्हापूर जिल्हा मनाईचा आदेश आपणास दिला.


कायदा पाळणारा माणूस म्हणून आपली ओळख आहे. कायद्याचा आदर करत मी कराड रेल्वेस्टेशनवर उतरलो, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Kirit Somaiya : मुंबईला रवाना
सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास खास कारने कराड व कोल्हाूपर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ताब्यात घेतलेल्या किरीट सोमय्या यांना मुंबईकडे रवाना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -