Saturday, April 13, 2024
Homenewsबामणोली ग्रामसेवक ६ हजाराची लाच घेताना जाळ्यात

बामणोली ग्रामसेवक ६ हजाराची लाच घेताना जाळ्यात


बामणोली (ता. मिरज) येथील ग्रामसेवक अण्णासो शामराव मलमे (वय ५६) यास ६ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. जमीन खरेदी करीत असलेल्या गटाचा गावठान दाखला देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे

याबाबत पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे म्हणाले, तक्रारदार यांनी जमीन खरेदी करीत असलेल्या गटाचा गावठान दाखला मिळणेबाबत बामणोली ग्रामपंचाय कार्यालयात अर्ज केला होता. सदरचा दाखला देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मलमे यांनी तक्रारदार यांचेकडे ६ हजार रूपये लाचेची मागणी केली.

त्याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यामध्ये मलमे यांनी गावठान दाखला देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे ६ हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज ग्रामपंचाय कार्यालयात सापळा लावला. त्यात मलमे तक्रारदार यांचकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून ६ हजार रूपये स्विकारलेनंतर त्यांना पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखालील सुजय घाटगे पोलिस उपअधीक्षक गुरूदत्त मोरे, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संजय कलगुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, भास्कर भोरे, सिमा माने राधिका माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -