Thursday, May 16, 2024
Homeमनोरंजनथिएटरमध्ये स्वस्तात पाहता येणार चित्रपट..? स्नॅक्सच्या किंमतीही कमी होणार..?

थिएटरमध्ये स्वस्तात पाहता येणार चित्रपट..? स्नॅक्सच्या किंमतीही कमी होणार..?

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉलीवूड चित्रपट फ्लाॅप होत आहेत. त्यामुळे थिएटर मालक, चित्रपट निर्मात्यांसह वितरकांची चिंता वाढली आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येत नसल्याने, थिएटर मालक तिकिटाचे दर कमी करण्याच्या विचारात आहेत.

राष्ट्रीय सिनेमा दिनी तिकिटांची किंमत 75 रुपये करण्यात आली होती. परिणामी, या दिवशी 60 लाखांहून अधिक लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे पाहिले. ही बाब लक्षात आल्यानंतर आता तिकिटाचे दर कमी करण्याचे नियोजन आहे.

मल्टिप्लेक्समधील सिनेमाच्या तिकिटांची किंमत ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतात. हा प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा थिएटरकडे आणण्यासाठी सिनेमागृहाचे मालक व वितरक हे कमी व मध्यम बजेट चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. विकेंडलाही अशी ऑफर देण्याची योजना आखली जात आहे.

स्नॅक्सची किंमतही कमी होणार

थिएटरमधील महागड्या स्नॅक्सबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता खाद्यपदार्थ व पेयांच्या किमतीही परवडतील, अशा ठेवल्या जाऊ शकतात.

गेल्या आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चुप’ चित्रपटांची तिकिटे 100 रुपयांना विकली. आता अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट 2 नोव्हेंबरला रिलीज होत असून, त्यावर 50 टक्के सूट दिली आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ या चित्रपटाचे तिकिट पहिल्या दिवशी 150 रुपये केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -