Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनहेमा मालिनी यांचे गोरे गोरे गाल आणि कंबरबाबत काय म्हणाली राखी सावंत

हेमा मालिनी यांचे गोरे गोरे गाल आणि कंबरबाबत काय म्हणाली राखी सावंत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता तर तिथे थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. मोदीजी चहा बनवताना पंतप्रधान (PM) बनू शकतात. तर मी मुख्यमंत्री (CM) का होऊ शकत नाही, असं राखी सावंत हिने म्हटलं आहे. राखी सावंत हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



राखी सावंत म्हणाली, तुम्ही हसण्यावर नेऊ नका. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला मुख्यमंत्री बनवलं तर मी ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्यासारखे गोरे गोरे गाल आणि गोऱ्या कंबरसारखे रस्ते बनवेल. राखी सावंतचा व्हिडिओ सोशल मीडियात वाऱ्यासारखा पसरतो आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाली राखी सावंत…
राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राजकारणात पदार्पण करण्यावरून राखीने आपलं मत मांडलं आहे. राखी म्हणाली, की तिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पुढे तिने सांगितलं, तिला मुख्यमंत्री बनवलं तर ती देशातील जनतेसाठी काय काय करेन. ती म्हणाली, मला देशाचं मुख्यमंत्री बनवलं तर आधी ती ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या गोरे गोरे गाल आणि गोऱ्या कंबरसारखे रस्ते बनवेल. आपली ड्रीमगर्ल जशी सुंदर आहे. अगदी तसेच रस्ते बनवेल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -