Monday, August 4, 2025
HomeयोजनानोकरीBECIL मध्ये असिस्टंट आणि ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी भरती, 58000 रुपयांपर्यंत मिळेल पगार!

BECIL मध्ये असिस्टंट आणि ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी भरती, 58000 रुपयांपर्यंत मिळेल पगार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लिमिटेड म्हणजेच ने भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. BECIL ने नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) च्या कार्यालयात असिस्टंट आणि ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.


इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचे आहेत ते BECIL ची अधिकृत वेबसाईट www.becil.com ला भेट देऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 24 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. जर तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत अधिसूचना वाचावी.

अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 ऑक्टोबर 2022

BECIL Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील –
असिस्टंट इंजिनिअर -1 पदं
ज्युनिअर इंजिनिअर – 4 पदं

BECIL Recruitment 2022 : पात्रता –
असिस्टंट इंजिनिअर –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवलेली असावा. तसंच सरकारी संस्था/संस्था/स्वायत्त संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये इमारतींच्या बांधकामाचे नियोजन/डिझाइनिंग आणि पर्यवेक्षण करण्याच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

ज्युनिअर इंजिनिअर –
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवाराने सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान 55% गुणांसह डिप्लोमा केलेला असावा. तसंच, सिव्हिल इंजिनीअरिंग कामांचे नियोजन/अंमलबजावणी/देखभाल यामध्ये दोन वर्षांचा कामाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

BECIL Recruitment 2022 : नोकरीचे ठिकाण –
असिस्टंट इंजिनिअर – दिल्ली
ज्युनिअर इंजिनिअर – 3 पदं दिल्ली आणि 1 पदं भोपाळ

BECIL Recruitment 2022 : पगार –
असिस्टंट इंजिनिअर – 58,819 रुपये प्रति महिना
ज्युनिअर इंजिनिअर – 27,000 रुपये प्रति महिना

BECIL Recruitment 2022 : निवड प्रक्रिया –
उमेदवारांच्या अर्जाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती मिळेल.

BECIL Recruitment 2022 : अर्ज फी –
सामान्य – 885 रुपये
ओबीसी- 885 रुपये
एससी/एसटी- 531 रुपये
माजी कर्मचारी – 885 रुपये
महिला – 885 रुपये
EWS/PH – 531 रुपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -