किरकोळ कारनातून मारहानित गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर शिर्के ( वय 30 रा. उत्तरेश्वर पेठ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटी येथे विरुद्ध दिशेने दुचाकी नेल्याचे जाब विचारल्याच्या रागातून सागरला मारहाण करण्यात आली होती.
या मध्ये तो गंभीर जखम झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरनी सौरभ सरनाईक व त्याच्या साथीदार अक्षय साळोखे याना पोलिसांनी अटक केली आहे. सागरच्या पश्चात भाऊ, बायको, दोन मुले असा परिवार आहे.