Sunday, July 27, 2025
Homeयोजनानोकरीबॉम्बे हायकोर्टात 7 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, 47000 रुपये मिळेल पगार!

बॉम्बे हायकोर्टात 7 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, 47000 रुपये मिळेल पगार!


सातवी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बॉम्बे हायकोर्टात सफाई कर्मचारी (Sweeper) पदांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे. यासंदर्भात बॉम्बे हायकोर्टाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.



बॉम्बे हायकोर्टाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 21 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. सफाई कर्मचाऱ्यांच्या दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Bombay High Court Recruitment 2022 : महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 ऑक्टोबर 2022

Bombay High Court Recruitment 2022 : पदांचा तपशील –
सफाई कामगार (Sweeper) – 2 जागा

Bombay High Court Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

Bombay High Court Recruitment 2022 : अनुभव –
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Bombay High Court Recruitment 2022 : पगार –
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला 15,000 रुपये ते 47,600 रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.

Bombay High Court Recruitment 2022 : महत्वाची कागदपत्रं –
– उमेदवाराचा बायोडेटा
– सातवीचे शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड किंवा लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -