ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्डनेस आणि वेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. साडी असो किंवा बिकिनी उर्फी तिचा प्रत्येक ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करत बोल्डनेस सादर करत असते. अशातच उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा न पाहिलेला लूक पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये उर्फी साडीत दिसत आहे. मात्र तिने नेसलेली ही साडी साधीसुधी साडी नव्हती. उर्फीने या साडीवर डीपनेक ब्लाऊज परिधान केला होता आणि तिने ही साडी मर्यादेपेक्षा खाली नेसली होती. उर्फीने तिचा हा बोल्ड लूक शेअर करून चाहत्यांची झोप उडवली आहे.

उर्फीने नेसली होती बोल्ड साडी
उर्फीने कोणताही ड्रेस किंवा साडी परिधान केली की चर्चा होतेच. कारण तिचा ड्रेसिंग सेन्स हा खूपच बोल्ड असतो. एकदा उर्फीने एअरपोर्ट लूक म्हणून साडी नेसली होती. मात्र ही साधारण साडी नसून मधूनच उघडलेली साडी होती. साडीला ब्लाउजच्या मधोमध एक कट होता, यामुळे उर्फीची क्लीवेज दिसत होती आणि मध्ये कापड नसल्यामुळे उर्फीचे पोट आणि नाभी देखील दिसत होती. इतकंच नाही तर साडीच्या बाजूलाही हाय स्लिट होता. यामुळे उर्फी अधिकच बोल्ड दिसत होती.
फोटो शेअर करून उडवली झोप
उर्फीचा हा लूक जुना असून तिला तो आठवला आहे. खरंतर उर्फीने या अतरंगी साडीत आरशात सेल्फी घेतला असावा. त्यानंतर तिने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीने फक्त फोटो शेअर केला नाही तर तिने चाहत्यांना विचारले आहे की, ‘तुम्हाला ही साडी आठवते का.. जी मी एअरपोर्टवर नेसली होती?’