Sunday, February 22, 2026
Homeसांगलीकुपवाड येथे घराचे कुलूप तोडून सोने लंपास ; गुन्हा दाखल

कुपवाड येथे घराचे कुलूप तोडून सोने लंपास ; गुन्हा दाखल

हमालवाडी कुपवाड येथे घराचे कुलूप तोडून चोरट्याने सोन्याचे गंठण चोरून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सौ उषा राजाराम कुपनूर वय 27 वर्षे ,व्यवसाय मजुरी राहणार हमालवाडी कुपवाड ,या तुळशीराम खांडेकर यांचे घरी भाड्याने राहत असून, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ,घरातून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे . याबाबत उषा राजाराम कुपनूर यांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली असून ,पोलिसांनी कलम 454 , 457 ,380 नुसार गुन्हा दाखल केला आहे . एमआयडीसी कुपवाड पोलीस सदर घरफोडीच्या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -