Thursday, December 18, 2025
Homeसांगलीअरग येथे शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद, शिंदे गटाच्या समर्थकाला...

अरग येथे शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद, शिंदे गटाच्या समर्थकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याने मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अरग येथे अजय कलगोंडा पाटील वय 27 याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून मोहसीन मकानदार सुरेश कवाळे अक्षय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे शिवसेनेचा अजय पाटील याने एकनाथ शिंदे गटात काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता.

याचा राग मनात धरून तिघांनी घरासमोर येऊन शिंदे गटात का गेलास इथे फक्त ठाकरे गट चालतो असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याचे धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी दोन्ही गटावर प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे दोन्ही गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -