ताजी बातमी ऑनलाईन टीम
अंधेरी पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यावर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटावर जोरदार आसुड ओढलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला उघडपणे आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेसमोर या. स्वत: पक्ष काढा, भाजपमध्ये जा पण तुम्हाला प्रत्येकवेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण तुम्हाला शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती गोशाळेत बांधायची आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे.