Friday, August 1, 2025
Homeक्रीडाभारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकणार का? आज ‘असा’ आहे संघ..

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकणार का? आज ‘असा’ आहे संघ..

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. आता आज एकदिवसीय मालिका कोण जिंकणार याकडे लक्ष लागले आहे. आज पुन्हा भारताचे युवा फलंदाज व गोलंदाज आपली जादू दाखवणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आजच्या होणाऱ्या सामन्याबद्दल अधिक जाणून घेऊयात..

सामना कधी आणि कुठं पाहाल..?

▪️ सामन्याची वेळ: आज (11 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.

▪️ आजचा तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. तरी सामन्यावर पावसाचे सावट असल्याने मर्यादित षटकांचा खेळ खेळवला जाऊ शकतो.

भारत संभाव्य संघ: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, आवेश खान. (राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, रवी बिष्णोई, मुकेश कुमार)

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ: जानेमन मलान, क्विंटन डी कॉक, रिझा हेन्रिंक्स, एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज (कर्णधार), कगिसो रबाडा, बिजोन फॉर्चुन, वेन पार्नेल, एन्रिक नॉर्किया. (ट्रीस्टन स्टब्ज, फेलुक्वायो, प्रिटोरियस, मार्को जेन्सन, तबरेज शम्सी, एनगिडी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -