Saturday, August 2, 2025
HomeसांगलीSangli : हस्तीदंताची तस्करी करणारी टोळी गजाआड, कवठेमहांकाळ पोलिसांची मोठी कारवाई

Sangli : हस्तीदंताची तस्करी करणारी टोळी गजाआड, कवठेमहांकाळ पोलिसांची मोठी कारवाई

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हत्तीच्या हस्तीदंताची तस्करी (ivory smuggling) करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत जप्त (ivory smuggling) केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

कशाप्रकारे केली कारवाई?


कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून चार जण हस्तीदंत (ivory smuggling) घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी चारजण खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रोडलगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्त दंत (ivory smuggling) घेऊन थांबलेले आढळून आले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चार आरोपींना अटक


कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन (ivory smuggling) येणारे दोन आरोपी आणि सांगलीमधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. या चारही आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात (ivory smuggling) आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी राहुल रायकर, बालाजी बनसोडे हे दोघे कोल्हापुरमधील तर कासीम काझी हा मिरज आणि हणमंत वाघमोडे हा कर्नाटकमधील रहिवासी आहे. कवठेमहांकाळ पोलिसांच्या या धडाकेबाज आणि धक्कादायक कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्व स्थरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -