Friday, November 22, 2024
HomeनोकरीJob News: खासगी क्षेत्रातील मोठी बातमी! ऐन दिवाळीत या बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांवर...

Job News: खासगी क्षेत्रातील मोठी बातमी! ऐन दिवाळीत या बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी . प्रत्येक जण या उत्सवाची आतुरतेनं वाट पाहतो. कर्मचाऱ्यांसाठी तर दिवाळी ही आनंदाची पर्वणीच ठरते. कारण दिवाळीत बोनससह पगारवाढची प्रतीक्षा पूर्ण होत असते. अशात यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आली आहे. दिवाळी तोंडावर असताना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. जगभरात आर्थिक मंदीचं सावट गडद होत आहे. अशात बऱ्याच बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरुझाली आहे. याचाच भाग म्हणजे एका मोठ्या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.



कंपनीने हजारो कर्मचारी कपातीचा निर्णय घेलात आहे. याबाबत ब्लूमबर्गचा हवाला देत रॉयटर्सनं देखील वृत्त दिले आहे. या माहितीनुसार इंटेल कॉर्प हजारो कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. कंपनी जवळपास 20 टक्के कर्मचारी कमी करणार आहे. यात सेल्स मार्केटिंग आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कंपनीच्या सेल्सवर झाला परिणाम
रिपोर्टनुसार इंटेलमध्ये कंपनीत जुलै 2022 मध्ये एकूण 1,13,700 कर्मचारी काम करत होते. दरम्यान, कोरोना काळात इतरत्र मंदी असतानाही इंटेलला सेल्समध्ये जोरदार उसळी मिळाली होती. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईने बाजारपेठेवर मोठा परिमाण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे संगणक आणि तत्सम उपकरणांची विक्री कमी होत याचा थेट परिणाम इंटेलच्या सेल्सवर झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -