ताजी बातमी ऑनलाईन टीम
ब्रेस्ट हा महिलांच्या शरीरावरील महत्त्वाचा भाग आहे. याचा संबंध महिलांच्या सौंदर्याशी देखील जोडला जातो. अशा वेळी ब्रा हा महिलांच्या कपड्यांमधील महत्त्वाचा भाग असते. कारण यामुळे ब्रेस्टला चांगली फिटिंग मिळते आणि शरीर आकर्षक दिसते. महिलांनी ब्रा घालावी की, घालू नये हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न असतो. दरम्यान सध्या भारतात ब्रेस्ट कँसर होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेता भारतात 13 ऑक्टोबर रोजी ‘नॅशनल नो ब्रा डे’ साजरा केला जातो, स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे.
2011 पासून दरवर्षी 13 ऑक्टोबरला नो ब्रा डे साजरा केला जातो. 13 तारीख निवडण्यामागे देखील कारण आहे. कारण ही तारीख ऑक्टोबर महिन्याच्या मध्यभागी येणारी तारीख आहे. ऑक्टोबर हा महिना इंटरनॅशनल ब्रेस्ट कँसर अवेअरनेस महिना आहे. हा संपूर्ण महिना ब्रेस्ट कँसरविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
नो ब्रा डे हा दिवस महिलांनी ब्रा घालू नये यासाठी साजरा केला जात नाही. या दिवसाचा उद्देश ब्रेस्ट कँसरविषयी जागृकता निर्माण करणे हा आहे. महिलांचे त्यांच्या स्तनांवर लक्ष केंद्रीत व्हावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. म्हणजेच या एक दिवशी महिला ब्रापासून मुक्त व्हाव्यात आणि त्यांनी आपल्या ब्रेस्टकडे लक्ष द्यावे. महिलांना ब्रेस्ट कँसरचे सुरुवातीचे लक्षण कळावे. जर त्यांना काही लक्षणं जाणवली तर त्यावर उपचार त्यांनी घ्यावे. कारण कँसर हा एक जीवघेणा आजार आहे. सुरुवातीच्या स्टेप्सला या आजारावर उपचार करणे शक्य आहे. हा आजार देशात सर्वात झपाट्याने पसरणारा घात रोग आहे. भारतात दरवर्षी ब्रेस्ट कँसरचे 1.3 लाख नवीन प्रकरणे समोर येतात. एका दशकापूर्वी हा आकडा 54,000 होता. जो वाढल्याने आता चिंता वाढली आहे.
ब्रेस्ट कँसरची सुरुवातीची लक्षणं काय?
स्तन किंवा काखेत गाठ येणे.
स्तनाच्या आकारात बदल होणे, म्हणजेच ते जास्त मोठे किंवा वेगळ्या दिशेने वाढणे.
स्तन किंवा निप्पलवर लालसरपणा येणे.
स्तनातून रक्तस्त्राव होणे.
स्तनाच्या त्वचेत कठोरता येणे.
स्तन किंवा निप्पलमध्ये मध्ये डिंपल, जळजळ किंवा कठोरता येणे.
स्तनाचा कोणताही भाग इतर भागांपासून वेगळा होणे.
ब्रेस्ट कँसर टाळण्यासाठी काय करावे?
नियमित व्यायाम करावा. ज्यामुळे तुमच्या शरीरावर अनावश्यक चरबी जमा होणार नाही. ट्यूमर किंवा गाठ वाढवण्यासाठी आपल्या फॅट कोशिका या जबाबदार असतात.
धुम्रपान आणि दारुचे सेवन करणे टाळावे. सध्याच्या काळात महिलांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. या कारणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कँसर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे आणि नुकसान दोन्हीही आहे. ज्या महिला नेहमीच गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात, त्यांना ब्रेस्ट कँसरचा धोका वाढतो.
आपल्या मुलांना स्तनपान करणे खूप आवश्यक आहे. यामुळे बाळांना तर फायदा होतोच यासोबतच मोतेलाही फायदा होतो. ज्या महिला स्तनपान करत नाहीत, त्यांना स्तनपान करणाऱ्या महिलांच्या तुलनेत ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका जास्त असतो.
पौष्टिक आहाराचे सेवन करा, ब्रेस्ट कँसरपासून बचाव करायचा असेल तर संतुलित आहार खूप महत्त्वाचा असते. आहारामध्ये फळ, ज्यूस, हिरव्या भाज्यांचा वापर करा.