Sunday, December 22, 2024
Homenewsशेतकर्यांच्या भारत बंदला बँक कर्मचारी संघटनांचा पाठिंबा

शेतकर्यांच्या भारत बंदला बँक कर्मचारी संघटनांचा पाठिंबा


कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला बँक कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चासोबत केंद्र सरकारने नव्याने चर्चेला सुरुवात करावी, अशी मागणीही ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशनकडून गुरुवारी करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांनी आपल्या मागण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश तसेच अन्य काही राज्यांत आंदोलन चालविलेले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली देशभरातील 40 शेतकरी संघटना एकवटलेल्या आहेत. गतवर्षी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेर्या पार पडल्या होत्या.

मात्र आंदोलनाच्या नावाखाली प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला दिल्लीत प्रचंड हिंसाचार झाल्यानंतर केंद्राने चर्चेतून अंग काढून घेतले होते. कृषी कायदे रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मात्र काही सुधारणा करावयाच्या असतील तर आपली चर्चेची तयारी आहे, असे सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे.
27 तारखेला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला bharat bandh कामगार, व्यापार संघटना, विद्यार्थी, महिला संघटना, वाहतूकदारांचा पाठिंबा असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -