Saturday, July 26, 2025
Homeमनोरंजनवेडेपणा करायला मुहूर्त नसतो... रितेश-जेनेलियाची केमस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार

वेडेपणा करायला मुहूर्त नसतो… रितेश-जेनेलियाची केमस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूड सुपरस्टार रितेश देखमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. सोशल मीडियावर तर त्यांचीच चर्चा असते. रितेश आणि जेनेलियाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ असो वा पोस्टर ते व्हायरल झाल्याशिवाय राहत नाहीत. या दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रितेश आणि जेनेलिया लवकरच त्यांच्या आगामी ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत चाहत्यांसोबत वेड चित्रपटाचे पोस्टर शेअर केले.



अभिनेता रितेश देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आगामी चित्रपट वेडचे पोस्टर शेअर केले. हे पोस्टर शेअर करत रितेशने याला खूपच सुंदर आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारीख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या. ‘

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -