Friday, July 25, 2025
Homeक्रीडाजाणून घ्या भारत विरुद्ध नेदरलँड सामना कधी, कुठे, पिच रिपोर्ट, पावासाचा अंदाज...

जाणून घ्या भारत विरुद्ध नेदरलँड सामना कधी, कुठे, पिच रिपोर्ट, पावासाचा अंदाज आणि सर्वकाही


टी-20 विश्वचषकात पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर गुरुवारी 27 ऑक्टोबरला भारताचा सामना नेतरलँडशी होणार आहे. भारतासारख्या अनुभवी संघासमोर नेदरलँडचा संघ कमकुवत मानला जात आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु सामन्यावेळी पाऊस आला तर भारताच्या हातून दोन गुण जाऊ शकतात. हवामानाच्या अंदाजानुसार सिडनीमध्ये ढगाळ वातावरण असून भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. असे झाले तर सामना रद्द होऊ शकतो आणि दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण दिला जाऊ शकतो.



कधी आणि कुठे खेळला जाईल सामना?
टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मधील भारत आणि नेदरलँड्स यांच्यात गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी होणार सामना आहे. हा सामना सिडनीच्या सिडणी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता. तसचे या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने हॉटस्टारद्वारे मोबाईलवर पाहता येईल.

सिडनीतील हवामानाचा अंदाज
सिडनीतील हवामानाच्या ताज्या रिपोर्टनुसार सकाळी 8:30 पासून सुरू होणाऱ्या बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान 70 ते 75 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. त्यामुळे भारताच्या सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही अशी केवळ आपण आशा करू शकतो. दरम्यान ताज्या रिपोर्टनुसार सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यादरम्यान खेळात पावसामुळे अडथळा येण्याची शक्यता नाही. या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -