ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे इंडस्ट्रीत तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. राधिका तिच्या दमदार अभिनयासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. राधिकाने ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमध्ये सेक्स कॉमेडी भूमिका केल्या होत्या. नुकत्याच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला की या चित्रपटानंतर मला अशाच भूमिकांची ऑफर देण्यात आली होती, परंतु मी त्यांना नकार दिला. यावेळी बोलताना तिने बॉलिवूडमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर देखील भाष्य केले आहे. येथे महिलांना वस्तू म्हणून विकले जाते असे वक्तव्य देखील तिने केले आहे.
महिलांना दिल्या जाणऱ्या वागणुकीविषयी काय म्हणाली राधिका? राधिकाने एका मुलाखतीमध्ये महिलांविषयी भाष्य केले आहे. 2015 मध्ये बदलापूर चित्रपट रिलीज झाला. यामध्ये राधिकाने अॅक्टर विनय पाठकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूप हिट ठरला होता. यामधील राधिकाच्या भूमिकेची प्रसिद्ध पाहून यानंतर तिला सेक्स कॉमेडी फिल्मच्या अनेक ऑफर आल्या. मात्र राधिकाने या ऑफर्स नाकारल्या. याचे कारण देखील राधिकाने सांगितले. ती म्हणाली की, ‘कॉमेडी जॉनरची मला काहीच अडचण नाही. मात्र या जॉनरमध्ये महिलांना एखाद्या वस्तूप्रमाणे सादर केले जाते. यामुळे मला भारतीय सिनेमातील सेक्स कॉमेडी पसंत नाही.
सेक्स कॉमेडीमध्ये महिलांचा अपमान
राधिका आपटे पुढे बोलताना म्हणाली की, ‘मला सेक्स कॉमेडी चित्रपटांची काही अडचण नाही. हंटरर हा देखील एक सेक्स कॉमेडी चित्रपट होता. मात्र बॉलिवूडमध्ये असे अनेक सेक्स कॉमेडी चित्रपट आहेत. ज्यांमधील कॉमेडीमुळे महिलांचा अपमान झाला आहे. सेक्स कॉमेडीच्या नावावर महिलांना वस्तू प्रमाणे विकले जाते. मला अशी कॉमेडी आवडत नाही. यामुळे मी असे चित्रपट नाकारते.’