Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट Smartphone! किंमत 7 हजार रुपयांच्या आत, फीचर्स वाचून व्हाल...

ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट Smartphone! किंमत 7 हजार रुपयांच्या आत, फीचर्स वाचून व्हाल खूश


तंत्रज्ञानाच्या जगातून रोज नवनवे अपडेट समोर येतात. मात्र दोन पिढ्यांमध्ये तंत्रज्ञानावरून कन्फ्यूजन दिसून येते. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन हाताळताना त्रास होतो. काही फीचर्स त्यांच्या डोक्यावरून जातात. त्यामुळे घरातील तरुण व्यक्तीला विचारण्याशिवाय गत्यंत्तर उरत नाही. जर तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर बेसिक फीचरसह दीर्घकाळ चालणारा बॅटरीवाला स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची ऑडिओ क्वालिटीसुद्धा जबरदस्त आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकासाठी जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय सर्वोत्तम ठरेल.



realme C30 स्मार्टफोन- हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळत आहे. मूळ किमतीपेक्षा स्वस्त म्हणजेच 17 टक्के सवलतीत विकला जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 8499 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर 6999 रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी स्टोरेज, 2 जीबी रॅम, 6.5-इंचाचा एचडी Plus डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5000 mAh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. पूर्ण चार्ज झाल्यानंतर बॅटरी दोन दिवस आरामात चालते.

Infinix Smart 6 स्मार्टफोन- फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत देखील ₹ 6999 आहे आणि ही किंमत त्याच्या मूळ किंमत ₹ 8999 पेक्षा 22 टक्के कमी आहे. जर आपण वैशिष्ट्याबद्दल बोललो तर या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6 HD Plus डिस्प्ले आणि 5000 mAh लिथियम पॉलिमर बॅटरी मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -