ताजी बातमी ऑनलाईन टीम
दोन राजघराण्याशी आहे संबंध
अभिनेत्री आदिती राव हैदरी हिचा दोन राजघराण्याशी संबंध आहे. एक मोहम्मद साहेल अकबर हैदरी आणि दुसरे जे. रामेश्वर राव. 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे माजी पंतप्रधान असलेले अकबर हैदरी यांची ती नात आहे. तर तिचे आजोबा राजा जे. रामेश्वर राव तेलंगणाच्या वनपर्थीवर राज्य करत होते.
आईनं दिलं वडिलांचे प्रेम
लग्नाच्या दोन वर्षांनी आदितीचे आई आणि वडील दोघेही वेगळे झाले. आदितीची आई ठुमरी गायिका होती. घटस्फोटानंतर आदिती तिच्या आईसोबत दिल्लीत राहत होती. अदितीच्या वडिलांना तिचा ताबा हवा होता पण, अदितीने आईसोबत रहाणं पसंत केलं.
वयाच्या 17 व्या वर्षी अभिनेत्याला केलं डेट
अदितीचे वैयक्तिक आयुष्य खूप रहस्यमय आहे. फारच कमी लोकांना माहित आहे की, अदितीने वयाच्या 17 व्या वर्षीच अभिनेता सत्यदीप मिश्राला डेट केलं आहे. जवळपास 4 वर्षे दोघानीं एकमेकांना डेट केलं.