ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस आहे. तिने आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान निर्माण केले आहे. ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूर येथे झाला. तिचे वडील कृष्णराज राय लष्करात बायोलॉजिस्ट होते. ऐश्वर्या राय बच्चनच्या जन्मानंतर तिचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले. आज तिच्या आयुष्याविषयी खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईत झाले शिक्षण
अभिनेत्रीने तिचे पूर्ण शिक्षण मुंबईतून केले आहे. शालेय जीवनात ऐश्वर्या राय बच्चनचा मेडिकल अभ्यासाकडे जास्त कल होता. तिचा आवडता विषय झुलॉजी होता. ती नववीत असताना एका टीव्ही जाहिरातीत दिसली होती. त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चननेही कलाकार होण्याचे ठरवले मात्र यासोबतच शिक्षण सुरु असावे म्हणून तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यासाठी तिने रचना संसद अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता, मात्र त्यानंतर तिचे मन मॉडेलिंगकडे वळले.
टीचरने सांगण्यावरुन केली मॉडलिंग
ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कॉलेज टीचरच्या सांगण्यावरून पहिल्यांदा मॉडेलिंग केली होती. अभिनेत्रीची एक शिक्षिका फोटो जर्नलिस्ट होती. त्यांना त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी काही फोटोशूट हवे होते. अशा वेळी सुंदर दिसणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन हिला टीचरने त्यांच्या मासिकासाठी फोटोशूट करण्याची विनंती केली होती. हे फोटोशूट केल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनचे मन हळुहळू मॉडेलिंगकडे वळू लागले. यानंतर तिने शिक्षण सोडून मॉडेलिंग सुरू केली.