ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली शहरातील शामराव नगर येथील ज्येष्ठराज कॉलनी मध्ये बालाजी साडी सेंटरला अचानक लागलेला भीषण आगीत सर्व साहित्य जळून खाक झालेले आहेत.. ही आग इतकी भीषण होती की याची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
शामराव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी त्वरित महापालिका अग्निशामक दलाला कळवून अग्निशमन गाड्या घटनास्थळी बोलावून घेतल्या अग्निशामन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले.या भीषण आगीत साडी सेंटर मधील सर्व साहित्य अंदाजे लाखो रुपयाचे साड्या व ड्रेस मटेरियल जळून खाक झाले आहेत.