ताजी बातमी ऑनलाईन टीम
लोकप्रिय मेसेजिंग व्हॉट्सअॅ अॅपने मोठी कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने मंगळवारी तडकाफडकी सप्टेंबर महिन्यात 26 लाख खाती प्रतिबंधित केली आहे. व्हॉट्सअॅपने ही कारवाई नव्या आयटी नियमांनुसार केली आहे. सोशल मीडियावर अधिक जबाबदाऱ्यांसाठी नियमांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.
व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअॅपला सप्टेंबरमध्ये भारतात 666 तक्रारी मिळाल्या. याआधीची विक्रमी कारवाईचा आकडा हा 23 इतका होता. आयटी नियम 2021 नुसार, व्हॉट्सअॅपने सप्टेंबर 2022 महिन्याचं अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये यूझर्स सुरक्षेबाबत तक्रारी मिळाल्या. या तक्रारीनुसार आणि व्हॉट्सअॅपकडून करण्यात आलेल्या कारवाईसह व्हॉट्सअॅपच्या कारवाईचा तपशीलचा उल्लेख आहे.
व्हॉट्सअॅपने भारतात ऑगस्ट महिन्यात 23 लाखांपेक्षा अधिक खराब अकाउंट्सवर प्रतिंबध घालण्यात आला. एडव्हान्स आयटी नियम 2021 नुसार, ज्या डीजीटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे 5 मिलीयनपेक्षा अधिक यूझर्स आहेत, त्यांना दरमहिन्याला अहवाल प्रसिद्ध करावा लागतो.
सोशल मीडिया मध्यस्थांनी फक्त यूझर्सना हानिकारक-बेकायदेशीर कंटेट अपलोड न करण्याबाबत माहिती देणे गरजेचं आहे. “भारतीय नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे”, असं केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.