Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरBreaking News : कोल्हापुरात भर चौकात दम मारो दम, तर तावडे हॉटेल...

Breaking News : कोल्हापुरात भर चौकात दम मारो दम, तर तावडे हॉटेल परिसरात आतषबाजी

कोल्हापुरात भर चौकात एक तरूण हुक्का मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धैर्यप्रसाद चौकात ही घटना घडली आहे. केवळ एकाच दिवशी हा प्रकार घडला नसून भर चौकात प्रत्येक 15 दिवसाला असाच प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. असे प्रकार घडत असताना गांधीनगर आणि कोल्हापूर पोलीस काय करत आहेत,असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

एवढेच नाही तर भर रस्त्यात तावडे हॉटेल परिसरात युवकांनी कारवर आतषबाजी केल्याचा व्हिडिओ हाती लागला आहे. भर चौकात दम मारो दम करणारा युवक हा बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर काही चौकात मध्यरात्री आतषबाजी करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पोलीसांनी तातडीने या प्रकारात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -