Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू

धक्कादायक! मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू

मुंबईत घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या नीलयोगस मॉलमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

टिळकनगर परिसरात राहणारी दालिशा करण वर्मा आई-वडिलांसोबत रविवारी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती. तिथे किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना तोल जाऊन ती खाली पडली. दालिशाला डोक्याला मार लागल्यानं ती बेशुद्ध पडली. तिच्य डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं आढळल्यानं दालिशाला मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -