Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : धक्कादायक..!अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्येस केले प्रवृत्त; एकास अटक

सांगली : धक्कादायक..!अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्येस केले प्रवृत्त; एकास अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली : कवठेमंकाळ तालुक्यातील जाधववाडी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला आत्महत्याच प्रवृत्त केल्याबद्दल दोन जणांच्या विरुद्ध कवठेमहाकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी कि, जाधववाडी गावातील अल्पवयीन मुलीची गावातील महावीर रामचंद्र भोसले व हर्षवर्धन भावड्या शहाजी सूर्यवंशी दोघे राहणार जाधववाडी तालुका कवठेमहाकाळ हे दोघे या मुलीची सतत छेड काढत असत. तसेच तिचा पाठलाग करून तिचा मोबाईल नंबरची मागणी करत या त्रासाला कंटाळून सदर अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती.



याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महावीर रामचंद्र भोसले व हर्षवर्धन भावड्या शहाजी सूर्यवंशी राहणार जाधववाडी तालुका कवठेमहांकाळ यांच्याविरुद्ध कलम ३०६, ३५४, ३५४ड तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम बाराप्रमाणे आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील आरोपी महावीर रामचंद्र भोसले २१ वर्ष यास अटक केली आहे. कवठेमंकाळ पोलीस गुन्हाचा पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -