टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 10 नोव्हेंबरला इंग्लंडसोबत सेमी फायनलचा सामना होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
इंग्लंडसारख्या तगड्या संघाविरुद्ध दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघ कसून तयारी करीत आहे. त्यासाठी खेळाडू वैयक्तिक नेट प्रॅक्टिक्स करीत होते. त्यावेळी 150 पेक्षा अधिक वेगाने आलेला एक चेंडू आर्म पूल करताना, रोहितचा शाॅट चुकला व चेंडू हाताला लागला.
सेमी फायनल खेळणार का..?
चेंडू लागताच रोहितने सराव बंद करुन हातावर उपचार करण्यास सुरुवात केली. याबाबत माध्यमातून बातमी समोर आल्यानंतर रोहित सेमी फायनलमध्ये खेळणार का, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, रोहितच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आलीय.
रोहित शर्माची दुखापत गंभीर नसल्याचं कळतंय. काही वेळ आराम केल्यावर त्याने पुन्हा एकदा बॅटिंगचा सराव केला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचं स्पष्ट झाल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.






