Sunday, February 22, 2026
Homeक्रीडाIPL 2023 साठी सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंची यादी...

IPL 2023 साठी सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर

इंडियन प्रिमिअल लीग अर्थात आयपीएल 2023 साठी सर्व 10 संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये मिनी ऑक्शन होणार आहे. विशेष म्हणजे रिलीज केलेले क्रिकेटपटू देखील मिनी ऑक्शनमध्ये सहभाही होऊ शकतात. तसेच या ऑक्शनमध्ये दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यात बेन स्टोक्स, सॅम करण, कॅमरन ग्रीनचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्स:
IPL मधील गतउपविजेता राजस्थान रॉयल्स संघाकडे 13.2 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच या संघाने यावेळी नऊ क्रिकेटपटूंना रिलीज केलं आहे. तर विदेशी स्लॉटमध्ये केवळ 4 क्रिकेटपटूंची जागा शिल्लक आहे. यंदा अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डेरिल मिथेल, जेम्स नीशम, करुण नायर, नाथन कुल्टर-नाईल, रासी वान डर डुसेन, शुभम गडवाल, आणि तेजस बरोकाला डच्चू देण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स संघ:
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा.

दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने पाच क्रिकेटपटूंना रिलीज केलं आहे. त्यात शार्दुल ठाकूरचा समावेश आहे. शार्दुल हा कोलकाता नाईट राइडर्समध्ये दिसणार आहे. शार्दुल शिवाय टिम सीफर्ट, अश्विन हेब्बर, श्रीकर भरत, मनदीप सिंहला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर अमन खान आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ:
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हीड वार्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच क्रिकेटपटूंची सुट्टी केली आहे. त्यात जेसन बेहरेनडॉर्फ, अनीश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनिथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्डचा समावेश आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्सकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून विदेशी स्लॉटमध्ये दोन खेळाडूंची जागा रिक्त आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ:
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिन्दु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

लखनौ सुपर जाएंट्स
लखनौ सुपर जाएंट्स संघाने सात क्रिकेटपटूंना आऊट केलं आहे. त्यात एंड्रयू टाय, अंकित राजपूत, दुशमंथा चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीमचा समावेश आहे. या संघाकडे 23.35 कोटी रुपये शिल्लक असून विदेशी स्लॉटमध्ये 4 खेळाडूंची जागा रिक्त आहे.

लखनौ सुपर जाएंट्स संघ:
केएल राहुल (कर्णधार), आयुष बदोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, काइल मेयर्स, क्रुणाल पांड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्स
आयपीएल चॅपियन्स गुजरात टायटन्सने सहा क्रिकेटपटूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात रहमानुल्लाह गुरबाज, लॉकी फर्ग्यूसन, डोमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंह, जेसन रॉय आणि वरुण एरॉनचा समावेश आहे. या संघाकडे 19.25 कोटी रुपये शिल्लक असून विदेशी स्लॉटमध्ये 3 खेळाडूंची जागा रिक्त आहे.

गुजरात टायटन्स संग:
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेविड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद.

कोलकाता नाईट राइडर्स
कोलकाता नाईट राइडर्सने 16 क्रिकेटपटूंची सुट्टी केली आहे. तसेच संघाने तीन क्रिकेटपटूंना ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी केलं आहे. यात लोकी फर्ग्यूसन, रहमनुल्लाह गुरबाज आणि शार्दुल ठाकूरचा समावेश आहे. तसेच रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंमध्ये पॅट कमिंस, सॅम बिलिंग्स, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, एरोन फिंच, एलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंह, रमेश कुमार, रसिख सलाम आणि शेल्डन जॅक्सनचा समावेश आहे. संघाकडे 7.5 कोटी रुपये शिल्लक आहे. तर विदेशी स्लॉटमध्ये 3 खेळाडूंची जागा आहे.

कोलकाता नाईट राइडर्स संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार),नीतीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लोकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टीम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह.

पंजाब किंग्ज
पंजाबने नऊ क्रिकेटपटूंना रिलीज केले आहे. त्यात गेल्या वर्षाचा कर्णधार मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकळ, संदीप शर्मा, ऋतिक चटर्जीचा समावेश आहे. यंदा शिखर धवनच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्ज संघ मैदानात उतरणार आहे. तर पंजाब संघाला ट्रेवर बेलिस यांच्या रुपात नवा प्रशिक्षक मिळाला आहे. या संघाकडे 32.2 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर विदेशी स्लॉटमध्ये तीन खेळाडूंची जागा रिक्त आहे.

पंजाब किंग्ज संघ:
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषि धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व ताएडे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत बरार.

चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आठ क्रिकेटपटूंची सुट्टी केली आहे. यात ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, एडम मिल्ने, हरि निशांत, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशनचा समावेश आहे. रवींद जडेजा पुन्हा एकदा चेन्नईच्या जर्सी दिसणार आहे. चेन्नईकडे एकूण 20.45 कोटी रुपये शिल्लक आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघः
एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हँगरगेकर, ड्वाइन प्रीटोरियस, मिशेल सेंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा.

सनराइजर्स हैदराबाद
सनराइजर्स हैदराबादने 12 खेळाडूंना डच्चू दिला आहे. त्यात कर्णधार केन विलियम्सन आणि निकोलस पूरनचा समावेश आहे. त्याचबरोबर जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णु विनोद देखील आहे. या संघाकडे 42.25 कोटी रुपये शिल्लक असून विदेशी स्लॉटमध्ये 4 खेळाडूंची जागा रिक्त आहे.

सनराइजर्स हैदराबाद संघ…
अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जानसन, वाशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने पाच विदेशी क्रिकेटपटूंसह एकूण 13 खेळाडूंना संघातून आऊट केलं आहे. त्यात अनमोलप्रीत सिंहस, आर्यन जुयल, बसिल थंपी, डेनियल सॅम्स, फॅबियन एलेन, जयदेव उनादकट, कीरोन पोलार्ड, मयंक मार्कंडेय, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, राइली मेरिडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्सचा समावेश आहे. संघाकडे एकूण 20.55 कोटी रुपये शिल्लक असून विदेशी स्लॉटमध्ये 3 खेळाडूंची जागा रिक्त आहे.

मुंबई इंडियन्स संघः
रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, देवल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंदुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडोर्फ , आकाश मधवाल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -