ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर शहर राजर्षी शाहू महाराज यांचे शहर आहे. त्यामुळे शहराने सर्वबाबती अग्रेसर असेल पाहिजे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कायापलट होईल अशी कामे करून सर्वच बाबतीत शहर टॉपवर आणा, अशा सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिका अधिकाऱयांना केल्या. कोल्हापूर महापालिकेमध्ये विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नागरिकांची ज्या ठिकाणी वर्दळ असते. त्या परिसरात मनपाकडून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. शाळा, महाविद्यालयाबरोबरच स्मशानभूमी, मटन मार्केटचा परिसर सुस्थितीमध्येच असला पाहिजे. विशेष करून शहर स्वच्छतेला प्राधान्या देण्यात यावे. मुंबईमध्ये दिवसा पाच वेळा सार्वजाणिक स्वच्छतागृहांची स्वच्छता होते. याचधर्तीवर कोल्हापूर शहरात स्वच्छता ठेवावी. लहान स्वरूपातील विकासकामांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून अशा कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. दोन महिन्यांत फरक जाणवेल असे काम करून दाखवा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या.
‘अंबाबाई तीर्थक्षेत्रा’तील कामे दर्जदार करा
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडांतर्गत सुरू असलेल्या कामांचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 8 कोटी 20 लाखांच्या निधीतून सरस्वती टॉकीजसमोरील बहुमजली पार्कींगमध्ये 300 वाहनांचे पार्कींग होणार असून याच ठिकाणी भक्ती निवासचे नियोजन आहे. यावर पालकमंत्री पाटील यांनी भक्ती निवास दर्जेदार झाले पाहिजे. भक्तांना सर्व सुविधा येथे उपलब्ध करा. येथील कामांसाठी जसा निधी खर्च होईल तसा पुढील टप्प्यातील निधी देवू, असे स्पष्ट केले.
पालकमंत्री महापालिकेत पहिल्यांदाच
पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार कोल्हापूर महापालिकेत प्रथमच आले. याबद्दल त्यांचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कोल्हापूरचे वैशिष्टे दिसेल अशी रंकाळय़ांची कामे करा रंकाळा तलावाच्या परिसरात 9 कोटी 87 लाखांच्या निधीतून संवर्धन आणि सुशोभिकरणची कामे होत असून याची माहिती अर्किटेक्ट सुरज जाधव यांनी दिली. यावर पालकमंत्री केसरकर यांनी जयपुरच्या धर्तीवर तलावात जुन्या पद्धतीचा बोटीचा वापर करावा. सुरक्षा भिंत, बैठक व्यवस्थेसाठी काळा रंगाचे दगडाचा वापर करा. शहरात कोणतीही विकास कामे करताना कोल्हापूरचे वैशिष्टे दिसेल अशा पद्धतीनेच करावीत, अशा सूचना केल्या.