Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 112 नंबरने वाचविले.. 2 हजार जणांचे प्राण…!

कोल्हापूर : 112 नंबरने वाचविले.. 2 हजार जणांचे प्राण…!

घटना क्रमांक 1 : लक्ष्मीपुरीतील एका नैराश्यग्रस्त तरुणाने आत्महत्या करण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून घेतले… .त्याच्या पत्नीने 112 कॉल केल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करत जीवदान दिले.

घटना क्रमांक 2 : इचलकरंजीतील शिवाजीनगरमधील एका महिलेने मुलीसह नदीमध्ये उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे असणाऱ्या नागरीकांनी तातडीने 112 नंबर डायल केला.अवघ्या पाचच मिनिटात अग्निशमनदलासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मायलेकींचा जीव वाचविला.

या आणि अशा असंख्य अतिगंभीर, गंभीर घटनांमध्ये 112 नंबर जीवदान देणारा,जीवरक्षक ठरला आहे. पोलिसांची डायल नंबर 112 ही हेल्पलाईन सुरू होऊन वर्ष झाले. या सेवेच्या माध्यमातून तब्बल 1900 जणांचे म्हणजे जवळपास दोन हजार जणांचे प्राण वाचविण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. बाराहजारहून अधिक जणांना तातडीचा मदतीचा हात लाभ आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलीस दलाच्या या सेवेचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित झाले आहे.

असे चालते 112 चे काम

एखादी महिला,पुरुष किंवा ज्येष्ठ नागरीक कोणत्या संकटात असतील किंवा एखाद्या ठिकाणी काही वाद, विवाद, तंटे सुरु असतील तर तेथून 112 नंबरला कॉल करण्यात येतो.हा कॉल मुंबई येथील 112 नियंत्रण कक्षाकडे जातो. यानंतर कोल्हापूर नियंत्रण कक्षातील कर्मचारी माहिती घेवून तेथून जवळ असणाऱ्या इआर व्ही (इमरजन्सी रिस्पॉन्स टिम) ला तत्काळ घटनास्थळी पाठवतात. शहरामध्ये 5 ते 10 मिनीट तर ग्रामीण भागात 10 ते 15 मिनीटात पोलीस घटनास्थळी पोहोचतात.

112 चा स्टाफ

112 नियंत्रण कक्षाकडे 38 चारचाकी, 46 दुचाकी आहेत. याचसोबत 3 अधिकारी, डिस्पॅच कर्तव्यासाठी 20 पोलीस अंमलदार,दोन इंजिनिअर असे मनुष्यबळ आहे. याचसोबत स्थानिक पोलीस ठाण्यातील 11 अधिकारी, 31 डिस्पॅचर अंमलदार, तसेच 490 पोलीस अंमलदारांना या साठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.24 तास सुरु असणारी ही हेल्पलाईन नंबर 29 सप्टेंबर 2021 पासून 112 ही प्रणाली वापरण्यास सुरुवात झाली.गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 12 हजार नागरीकांनी या प्रणालीचा वापर केला. यावर आत्महत्या करणाऱ्या लोकांना वेळेत मदतीचा हात देवून आत्महत्ये पासून परावृत्त करणे, बाल विवाह रोखणे, चेन स्नॅचर, अंमली पदार्थ किंवा अवैद्य व्यवसायांवर कारवाई, अपघात ठिकाणी मदत,घरगुती वादातील घटनांमध्ये मदतीचा हात दिला जात आहे.

112 वर कॉलनतंर मिळालेली मदत

-27 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 112 ला कॉल आला जयपूर राजस्थान येथे मर्डर झाला असून त्यातील आरोपी अशोक बडवाहा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत
जवाहरनगर येथे आहे. तरी तात्काळ मदत पाठवा यानंतर
अवघ्या 10 मिनीटात पोलिसांनी अशोक बडवाहा या आरोपीस जेरबंद केले.

-19 एप्रिल रोजी डायल 112 वर 4 वाजता फोन आला 17 वर्षाची एक मुलगी एका मुलासोबत आंबा येथे असून ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे कॉलरने सांगितले. यानुसार अवघ्या 20 मिनीटात तेथे पोलीस पोहोचून त्या मुलीची तात्काळ सुटका केली. चौकशीनंतर तो मुलगा त्या मुलीस पळवून नेवून लग्न करणार असल्याचे समोर आले.

  • 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता 112 नियंत्रण कक्षावर फोन अला त्यानुसार दाभोळकर कॉलनी येथील बेकर कॉलनीत एका महिलेस ऑफीसमध्ये काही मुलांनी बंद केले आहे. तिचे चित्रीकरण सुरु असून तिला मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. अवघ्या काही मिनीटात पोलीस तेथे पोहचून त्या महिलेची सुटका केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -